हाय फ्रेन्डस!!! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..
तिळ गुळ घ्या गोड-गोड बोला..
तुम्ही यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता का? मी सहभागी झालो होतो, सर्वात मजा आली सी-लिंकवरून धावताना, मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यामागे तेच एकमेव कारण होतं. हाफ मॅरेथॉनमध्ये मी धावलो, २१ कि.मीचा पल्ला.. जिंकलो नाही तरी चालेल पण २१ कि.मी. पल्ला गाठायचा एवढंच डोक्यात होतं. शिवाय मॅरेथॉनमध्ये कॉलेजातले फार जवळचे मित्रही सोबत होतेच. सॉलीड अनुभव होता.
अजय, तेजस, सोनल, आदिती आणि आकाश आमचा कॉलेजचा ग्रुप, कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आतापर्यत आम्ही एकत्र आहोत. मैत्रीत जशी भांडणे, हेवे-दावे, रूसवे-फुगवे असतात तसे आमच्यातही झाले. कुणास ठाऊक काय जादू आहे.. पण मैत्रीचा त्या सूक्ष्म धाग्याने आजतागायत आम्हाला एकत्र बांधून ठेवले आहे आणि यापुढेही ठेवो.. तो दिवस आठवला की आजही हसू आवरत नाही, ज्यावेळी मी सोनल आणि आदितीला पहिल्यांदा भेटलो.. कारण शाळेत असताना मैत्रीण हा विषय माझ्या काही फारसा जवळचा नव्हता, शाळेत बाई शिक्षा म्हणून मुलींमध्ये बसवायच्या. मुलींशी बोलायचं म्हणजे सॉलीड गोची, काय बोलायचं? कसं बोलायचं? असे अनेक प्रश्न पडायचे. कॉलेजमध्ये आकाशनेच सोनल आणि आदिती यांच्याशी ओळख करून दिली, मी फक्त हाय.. केलं (ते पण जरा दबक्या स्वरात), त्यानंतरचा दीड तास मी काही न बोलता त्यांच्याबरोबर बसलो होतो. मुलींच्या गराडय़ात असणं म्हणजे जास्त पॉप्युलर असणं, हे आकाशने मला सांगितलं तसंच कॉलेज लाईफस्टाईलमधल्या अनेक नव्या गोष्टीची ओळख त्याने करून दिली. शाळेतील समीकरणं कॉलेजात आल्यावर बदलल्याची जाणीव झाली..
he barobar ahe.. shalet astana mulinshi maitri karaychi himmatch navti... ani fyjc la tar navin college aslyane kahich samjat navte...college chi olakh hoiparyant 1st unit test madhye udalelo hoto...tase maze college pan jara jastach strict hote..i mean Kelkar college... tithe attendance tar itke strict hoti ki month end la black list lavli jaychi..jabradast dhamal keli...pan ekahi mulila patau shaklo nahi hyache dukh vatte ata...
ReplyDeletegood!!!
ReplyDeleteAsech tumche Anubhav shair kart raha.