Monday, January 4, 2010

ek katta... thoda khatta thoda meetha!

एक दिवस जीवन अशा वळणावर पोहोचेल, की मैत्री फक्त आठवणींच्या चौकटीतच अडकेल. कॉफीचा प्रत्येक कप मित्रांची आठवण करून देईल आणि मग हसता-हसता अचानक डोळे पाणावतील. ऑफिसच्या चेम्बरमध्ये क्लास रूम दिसू लागेल, पण ठरवून देखील प्रॉक्सी मारता येणार नाही. पैसे तर खूप असतील, पण ते खर्च करण्यासाठी कारणच नसेल. म्हणून सांगतो मित्रा पुरेपूर एन्जॉय कर हे दिवस, कारण ते पुन्हा कधीच येणार नाहीत’. परवाच झालेल्या रोझ डेच्या रात्री मॅकने पाठवलेला हा टेक्स्ट मेसेज आपण कॉलेजच्या शेवटच्या वर्षांत असल्याची प्रकर्षांने जाणीव करून गेला आणि आता आपलं कॉलेज लाईफ संपणार.. या विचारानेच आठवणींची चक्रे फिरू लागली.

कॉलेजची ती पाच वर्षे.. थोडी दचकतच सुरूवात केलेली.. कॉलेजचं ते पहिलं वर्ष.. सुरूवातीच्या दिवसांत निमूटपणे अटेन्ड केलेली लेक्चर्स.. कट्टय़ाची हवा लागल्यावर मात्र कसली लेक्चर्स आणि कसलं काय.. त्यानंतर नाटय़मंडळातला सहभाग.. सोम्याच्या टपरीवरची झक्कास कटिंग.. मित्राने मारलेली प्रॉक्सी.. खरंच मजेदार आठवणी.. तो पहिला अ‍ॅन्युअल डे.. पहिला कॉलेज फेस्टिव्हल.. थोडासा दुरूनच अनुभवलेला.. मग दुसऱ्या वर्षी मात्र व्हॉलेन्टिअर म्हणून मिरवलेले ते दिवस.. पुढे डिग्री कॉलेजला आल्यावर तर डिरेक्ट ऑर्गनायझेशन कमिटीतील स्थान.. काउन्सिलमध्ये, नाटय़मंडळात असल्याने ज्युनिअर्सवर चालणारा रुबाब.. एस.वाय.ला आल्यावर तर कॉलेजची सगळी सूत्रे आपल्याकडेच.. स्वत:च्या ताकदीवर आयोजित केलेला तो पहिलाच कॉलेज फेस्टिव्हल.. आयुष्यभराच्या मॅनेजमेन्टचे धडे देऊन जाणारा.. कधी न विसरता येण्यजोगा.. एकांकिकेच्या प्रयोगाकरीता काढलेली वर्गणी.. मजबूत धम्माल मस्तीचे मंतरलेले दिवस होते ते.. मात्र काळाच्या ओघात हे दिवस कसे सरून गेले ते कळलेच नाही आणि आता उरल्यात फक्त आठवणी.. अल्बमच्या चौकटीतील अशा आठवणी ज्या लाख प्रयत्न करून देखील मला विसरता येणार नाहीत. कारण त्या फक्त आठवणी नव्हत्या, तर होता मी घेतलेला मोकळा श्वास.. खरं सांगायचं तर पुढच्या वर्षी या कॉलेजलाईफशी आपला दुरान्वयानेही संबंध असणार नाही, ही कल्पनाच सहन होत नाहीये.. कॉलेजची ही पाच वर्षे पुन्हा रिवाइंड करता आली तर किती बरं होईल, असं वाटू लागलंय.. पुन्हा पुन्हा ते दिवस जगावेसे वाटत आहेत.. पण इलाज नाही.. हेय वेट वेट वेट.. पकलात तर नाही ना? सॉरी, आय फरगेट टू इन्ट्रोडय़ूस मायसेल्फ.. हे हाय फ्रेन्डस मी सॅम.. समर देशमुख. ए लास्ट इयर स्टुडेण्ट.. आय होप मी तुम्हांला जास्त पकवलं नाही. खूप इमोशनल झालो होतो यार.. असो. तुमच्यापैकीही अनेकजण माझ्यासारख्याच माइंड स्टेट मधून जात असाल ना? मग कॉलेजच्या पाच वर्षांंतील या मंतरलेल्या आठवणी आपण एकमेकांत शेअर केल्या तर? किती मजा येईल नाही! त्यामुळेच कॉलेजच्या या पाच वर्षांत अनुभवलेल्या असंख्य गंमती जमती मित्रांबरोबर शेअर केलेल्या आणि न केलेल्या आठवणीसुद्धा मी तुमच्या समोर या नव्या ब्लॉगमधून मांडणार आहे.. होप तुम्ही एन्जॉय कराल.. सी या बडी.. तर तुमचा अनुभव ६६६.ी‘‘ं३३ं.ुॠ२स्र्३.ूे नोंदवा. ल्ल सॅम

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=57&Itemid=70